By  
on  

अभिनेता प्रसाद ओकसोबतच्या ह्या चिमुकलीला ओळखलं? आता ही अभिनेत्री करतेय प्रसिध्द अभिनेत्यासोबत लग्न

अभिनेता प्रसाद ओकसोबत फोटोत दिसणारी ही चिमुरडी तुम्ही ओळखलीत का,...ही अभिनेत्री आता लवकरच एका प्रसिध्द अभिनेत्यासह लग्नाच्या बेडीत अडकणार आहे...तुम्ही ओळखलं नसेल तर आम्ही सांगतो...ही अभिनेत्री आहे, मिताली मयेकर. मराठी सिनेसृष्टीचा चॉकलेट बॉय अभिनेता सिध्दार्थ चांदेकरसोबत लग्न करणारआहे. काही  महिन्यांपूर्वीच त्यांचा साखरपुडा पार पडला. आता लग्नाआधीचा काळ ते मस्त देश परदेशात व्हेकेशन एन्जॉय करतायत. 

मितालीने हा लहानपणीचा फोटो शेअर करत त्यासोबत भावनिक पोस्ट लिहिली आहे. 'हिरकणी' सिनेमा निमित्ताने तिने हा फोटो शेअर केला आहे.  ”मी लहान असताना घरकूल ही मालिका न चुकता पाहायचे. या मालिकेची खूप मोठी चाहती होती. त्यातील एक अभिनेता मला प्रचंड आवडायचा. हाच तो अभिनेता आहे, ज्याच्यासोबत माझा हा फोटो आहे. सेलिब्रिटीसोबत फोटो काढण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. खूप हिंमत करून त्याच्यासोबत फोटो काढण्याची विनंती केली. त्यावेळी जरासुद्धा विचार केला नव्हता की दोन दशकांनंतर त्याच अभिनेत्यासोबत माझी चांगली मैत्री होईल आणि त्याच्यासोबत मी फिरेन. आज जरी मी त्याची मैत्रीण असले तरी सर्वांत आधी त्याची मोठी फॅन आहे. प्रसाद दादा शिवराज्याभिषेक गाण्यासाठी खूप खूप धन्यवाद. तुझ्या हिरकणी या चित्रपटाची मी आतुरतेने वाट पाहत आहे,” असं म्हणत मितालीने ही छान आठवण शेअर केली. 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

As a kid, I used to watch 'घरकुल' everyday and was a huge fan of this guy right here. Also, he is the very first celebrity I've ever met, I gathered the courage to go to him and asked for a picture. Who knew, after two decades or so, I'd hang out and be good friends with him. But the fan in me is still alive and I still look upto him in such awe like a 4 year old. Thank you Prasad Dada for शिवराज्याभिषेक गीत and I absolutely can't wait for हिरकणी. Love and light to you and @manjiri_oak #hirkani #songonloop #fanforever #20yearschallenge #10yearschallegewho? Also, Hi @umesh.kamat , I love you too!

A post shared by Mitali Mayekar (@mitalimayekar) on

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive