By  
on  

स्वराज्यासाठी बहिर्जी नाईकांनी घातलं शिवरायांना साकडं, ‘फत्तेशिकस्त’मधील हे गाणं रिलीज

स्वराज्याच्या पहिल्या सर्जिकल स्ट्राईकची गोष्ट सांगणा-या ‘फत्तेशिकस्त’ सिनेमाची चर्चा सर्वत्र आहे. या सिनेमातील गाणं नुकतंच रिलीज झालं. ‘जोगवा वाढ गं माये’ असं या गाण्याचं नाव आहे. या गाण्यात बहिर्जी नाईक छत्रपती शिवाजी महाराजांकडे स्वराज्याचा जोगवा मागताना दिसत आहेत. या सिनेमात भली मोठी स्टार कास्ट आहे. आदर्श शिंदे यांनी हे गाणं गायलं आहे.

 

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी या गीताचे बोल लिहिले आहेत. या गाण्यात चिन्मय मांडलेकर शिवाजी महाराजांच्या रुपात आणि, मृणाल देव जिजाऊंच्या रुपात आणि हरिष दुधाडे बहिर्जी नाईकांच्या रुपात दिसून येत आहे. या शिवाय सिनेमात निखिल राऊत, आस्ताद काळे, तृप्ती तोरडमल, रमेश परदेशी, नक्षत्रा मेढेकर, अजय पुरकर, अंकित मोहन, समीर धर्माधिकारी, मृण्मयी देशपांडे हे कलाकार आहेत. हा सिनेमा 15 नोव्हेंबरला रसिकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive