अभिनेत्री श्रिया पिळगावकर हे नाव सिनेमांमध्ये परिचित नसली तरी वेबसिरीजमध्ये या नावाचा बोलबाला आहे. श्रीयाने शाहारुख खानच्या ‘फॅन’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
श्रीया एक उत्तम अभिनेत्री आहेच. पण एक उत्तम स्विमर देखील आहे. शालेय जीवनात तिने स्विमिंगमध्ये अनेक बक्षिसं मिळवली आहेत.
‘एकुलती एक’ या मराठी सिनेमातून तिने मराठी सिनेमात पदार्पण केलं आहे. या सिनेमातील तिच्या व्यक्तिरेखेला महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट पदार्पणातील पुरस्कार मिळाला होता.
याशिवाय मिर्झापुर, बीचम हाऊससारख्या वेबसिरीजमधील तिच्या अभिनयाची तारीफही झाली.
आता श्रीया हाथी मेरे साथी, भंगडा पा ले या सिनेमातून रसिकांच्या भेटीला येत आहे. श्रीयाचे चाहते तिच्या या सिनेमाची नक्की वाट पहात असतील यात शंका नाही.