By  
on  

अष्टमीच्या दिवशी तेजस्विनी पंडितने साकारली व्यथित झालेली गावदेवी

अभिनेत्री तेजस्विनी पंडित गेले नऊ दिवस वेगवेगळ्या रुपात रसिकांच्या समोर येत आहे. नऊ दिवस नऊ समस्या ती प्रेक्षकांसमोर मांडत आहे. आज म्हणजे अष्टमीच्या दिवशी तिने गावदेवीचा लूक घेतला आहे. आज मात्र तिने या देवीच्या माध्यमातून तिने आरेमधील वृक्षतोडीवर भाष्य केलं आहे. या फोटोत झाडाला मिठी मारुन उभारलेली देवी दिसत आहे. याशिवाय तिने वृक्षतोडीकडेही लक्ष वेधलं आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

अष्टमी "गावदेवी" . . थांब घाव घालू नकोस......याच्या मुळावर घालू नकोस ....समस्येच्या मुळावर घाल.... इतके रस्ते इतकी वाहन असूनही तुला ‘वेग’ कमीच वाटतोय का? तुझा प्रवास सुखकर आणि वेगाने होण्यासाठी तू आज यांचा प्रवास संपवतोयस? किती हतबल आहे मी.....या संपत्तीला कसे वाचवू? किती जीव वैविध्याने सजवली होती मी हि वसुंधरा ...यावर हक्क फक्त तुमचाच कधी झाला? ....जंगलं साफ करा वस्त्या वाढवा....रस्ते बनवा...सोय फक्त स्वत:चीच बघा ....इतरांचे काय? ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ हे फक्त शोभेसाठीच न? Carbon dioxide कमी करणार असे सांगून स्वत: ची समजूत काढतोयेस का? मग निसर्गाने हे हिरवे नवल का रचले ? ते फक्त Carbon dioxide कमी करत नाहीत तर तुला ‘प्राणवायूचे’ वरदानही देतात.... अनेकांचा आश्रय आज निर्दयतेने कापून काढला जातोय....तुमचा प्रवास सोपा व्हावा म्हणून तुम्ही कुणाचा तरी प्रवास संपवत आहात. लक्षात ठेवा हा प्रवास आज त्यांचा संपतोय आणि कालांतराने तुमचा देखील.... . . Concept & Director : @dhairya_insta_ Photographer : @bharatpawarphotography Digital art by : @amol.hirawadekar @imvishalshinde @thenameisabhishekk Asst. Dir : @shraddha_kakade Jewellery by : @pngadgilandsons Makeup : @vinodsarode Hair : @sheetalpalsande Styled by : @stylistnakshu @saniyacool @pottering.vels Costumes By : @official_dadfashionstudio PR & Social Media By : @dreamers_pr Special thanks @jyotsnapethkar and @rjadhishh #aarey #saveaarey #gaodevi #navratri #tejaswinipandit

A post shared by Tejaswini Pandit (@tejaswini_pandit) on

 

Recommended

PeepingMoon Exclusive