By  
on  

Birthday special: गायक ते दिग्दर्शक असा होता सलील कुलकर्णी यांचा प्रवास

करीअरचा एक मार्ग चोखाळताना त्यावर जम बसला असताना दुसरी वाट निवडणं सोपं नसतं. पण गायक, दिग्दर्शक सलील कुलकर्णी यांनी मात्र ही वाट निवडली त्यात यशही मिळवलं. ‘आयुष्यावर बोलू काही’ या अल्बममधून सलील कुलकर्णी यांनी रसिकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. याशिवाय अनेक सिनेमातील गाण्यांना आवाजही दिला आहे.

सलील यांनी गायनानंतर ‘वेडिंगचा शिनेमा’ या गाजलेल्या मराठी चित्रपटाच्या माध्यामातून दिग्दर्शनात पदार्पण केलं आहे. पारंपारिक रीतीरिवाजांपासून आधुनिक फॅशन-तऱ्हा आणि पद्धती यांचा मिलाफ आणि त्यातून भरपूर कौटुंबिक मनोरंजन देणारा चित्रपट म्हणून ‘वेडिंगचा शिनेमा’चे कौतुक झाले. मुक्ता बर्वे, शिवाजी साटम, अलका कुबल, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर, भाऊ कदम, शिवराज वायचळ , ऋचा इनामदार या कलाकारांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, संगीत आणि दिग्दर्शन सलील कुलकर्णी यांचे होते.

याशिवाय ते आणखी एका सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. त्यांच्या आगामी ‘एकदा काय झालं’ या चित्रपटाचे पोस्टर सोशल मिडियावर झळकलं आहे. सलील कुलकर्णी यांना ‘पिपींगमून मराठी’कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Recommended

PeepingMoon Exclusive