By  
on  

पाहा Video : गरबा खेळताना व्हायरल झाले छोटे अण्णा नाईक

सध्या नवरात्रौत्सवाची धूम सुरु आहे. गरबा खेळण्यासाठी मोठ्यांसह छोट्यांचासुध्दा तितकाच उत्साह ओसंडून वाहत असतो. नवरात्रौत्सवात वेशभूषा स्पर्धा लहानांसाठी प्रमुख आकर्षण असतं. मग पालकसुध्दा त्यांना सजवण्यात कसलीच कसर मागे सोडत नाही. पण यंदा एका गरब्यामध्ये छोट्या अण्णा नाईकांनी धुमाकूळ घातला आहे. यावरुनच रात्रीस खेळ चाले मालिकेतील अण्णा नाईकांचा दरारा फक्त मालिकेतच नाही तर उत्सवांमध्येसुध्दा दिसून आला. 

अण्णा नाईक हे जरी मोठ्या व्यक्तीची  व्यक्तिरेखा असली  तरीही लहान मुलांमध्ये देखील ही व्यक्तिरेखा  लोकप्रिय आहे. त्यांची चालण्याची पद्धत, बोलण्याची लकब सगळ्यात हटके आहे. तर हीच स्टाईल हेरून चक्क एका सोसायटीमधील लहान मुलाने वेशभूषा स्पर्धेत 'अण्णा नाईक' यांची वेशभूषा करून तेच बेअरिंग पकडून सगळ्यांना आश्चर्यचकित केलं व हा व्हिडीओ आता प्रचंड व्हायरल होत आहे. 

 

पाहा Video :

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive