‘बकाल’ या मराठी सिनेमाचा म्युझिक लाँच सोहळा अशोक पत्की यांच्या हस्ते संपन्न

By  
on  

अशोल पत्की यांच्या संगीताचे आपल्यापैकी अनेक फॅन्स आहेत. आजवर अनेक गाण्यांना, टायटल साँगना त्यांनी पार्श्वसंगीत दिलं आहे. अलीकडेच त्यांनी ‘बकाल’ या सिनेमाला त्यांनी पार्श्वसंगीत दिलं आहे. या सिनेमाचा म्युझिक लाँच सोहळा अलीकडेच पार पडला. यावेळी अशोक पत्की यांनी या सिनेमाविषयीची एक बाब शेअर केली.

अशोक पत्की यांनी कधीही पाश्चात्य बाजाची गाणी कंपोझ केली नव्हती. पण दिग्दर्शक समीर आठल्ये यांच्या आग्रहास्तव त्यांनी पाश्चात्य चालीचं संगीत बकालमधील गाण्यांना दिलं आहे. याप्रकारे पत्की यांनी स्वत:च स्वत:ची चौकट तोडली आहे. गीतकार सुरेंद मसराम आणि मोरेश्वर निस्ताने यांनी या गाण्यांना शब्दबद्ध केलं आहे. अशोक समर्थ, अलका कुबल, गणेश यादव, यतीन कारेकर, मिलिंद गवळी, असीत रेडीज, जयंत सावरकर, पुजा नायक यांच्या अभिनयाने सजलेला बकाल हा सिनेमा 8 नोव्हेंबर रोजी रसिकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

Loading...
Share