विद्यार्थी नेता जॉर्ज रेड्डीच्या जीवनावर लवकरच 'जॉर्ज रेड्डी' हा तेलुगू सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 47 वर्षांपूर्वीचा हा संघर्ष जीवन रेड्डी मोठ्या पडद्यावर आणणार आहेत. जॉर्ज रेड्डी यांचा महाविद्यालयीन निवडणुकीच्या वादातून खून करण्यात आला ह्याच कथानकावर हा सिनेमा बेतला आहे. पण ह्या सिनेमाबाबतची एक रंजक गोष्ट म्हणजे या तेलुगू सिनेमाची मराठीसोबत 'नाळ' जोडलेली आहे.
'नाळ'चे दिग्दर्शक सुधाकर यक्कंटी हे 'जॉर्ज रेड्डी' सिनेमाचे सिनेमॅटोग्राफर आहेत. तसंच 'नाळ'चे दोन कलाकारसुध्दा ह्या तेलुगू सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. अभिनेत्री देविका दफ्तरदार ह्यात आईची भूमिका साकारतेय तर 'नाळ'चा हिरो म्हणजेच बालकलाकार श्रीनिवास पोकळे ह्याने बालपणीच्या जॉर्ज रेड्डीची भूमिका साकारली आहे.
मराठीसोबत 'नाळ' जुळलेला 'जॉर्ज रेड्डी' हा तेलुगू सिनेमा पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच उत्सुक असाल.