आदिनाथ कोठारे झळकणार धकधक गर्ल माधुरी दीक्षितसोबत

By  
on  

आदिनाथ कोठारेचं करीअर सध्या चांगलंच वेगात आहे. त्याने दिग्दर्शित केलेल्या ‘पाणी’ या सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. याशिवाय तो कबीर खानच्या ‘83’ सिनेमामध्येही झळकत आहे. या सिनेमाची रॅप अप पार्टी नुकतीच पार पडली. आता आदिनाथ आणखी एका नव्या सिनेमासाठी सज्ज झाला आहे. आदिनाथ आता धकधक गर्ल माधुरीसोबत दिसणार आहे.

माधुरी ‘पंचक’ नावाच्या सिनेमाची निर्मिती करत आहे, यासाठी आदिनाथची निवड झाल्याचं समजत आहे. या सिनेमा मल्टीस्टारर असून आदिनाथ मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमाचा मुहुर्त नुकताच पार पडला आहे. जयंत जठार या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. माधुरीने यापुर्वी ’15 ऑगस्ट’ या सिनेमाची निर्मिती डिजिटल माध्यमातून केली होती.

Recommended

Loading...
Share