By  
on  

पाहा Trailer : बहिण-भावाच्या नात्याची हदयस्पर्शी कहाणी 'खारी बिस्कीट'

'खारी बिस्कीट' म्हणजे नेमके काय? हा प्रश्न कित्येकांना पडला होता. तर ही आहे चिमुरड्या भावंडांची जोडगोळी. खारीसाठी बिस्कीट आणि बिस्कीटसाठी खारी म्हणजे जीव की प्राण. अवघ्या पाच वर्षांच्या गोंडस खारीची इच्छा म्हणजे आठ वर्षांच्या बिनधास्त बिस्किटसाठी राजकुमारीचा हुकूम. खारी हे जग तिच्या डोळ्यांनी पाहू शकत नसली तरी ती स्वप्नं बेमालूमपणे पाहते. तिनं असंच एक स्वप्न पाहिलंय वर्ल्डकपला जाण्याचं !
नुकत्याच रिलीज झालेल्या फिल्मच्या ट्रेलर मधून आपल्याला हे पाहायला मिळतं.

झी स्टुडिओज आणि ड्रीमिंग ट्वेन्टी फॉर सेव्हन यांनी 'खारी बिस्कीट' चित्रपटाची निर्मिती केली असून येत्या १ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

 

बिस्कीटची भूमिका आदर्श कदमने केलीय तर खारी साकारलीय वेदश्री खाडिलकर हिने याशिवाय सोहम जाधव, स्वानंद शेळके, शर्व दाते या बच्चेकंपनी सोबत नंदिता पाटकर, सुयश झुंझुरके आणि संजय नार्वेकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. सर्वांनाच आता ह्या सिनेमाची प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. 

 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive