सुचित्रा बांदेकर या नावाला खास ओळखीची गरज नाही. अभिनय किंवा प्रॉड्क्शन सुचित्रा यांनी प्रत्येकालाच स्वत:चा खास टच दिला आहे. ‘हम पांच’मधील स्विटीची मैत्रीण असलेल्या बबलीच्या भूमिकेमुळे त्या प्रकाशझोतात आल्या. त्यानंतर घरा की लक्ष्मी बेटियां, खामोशियां या मालिकांमधून त्यांनी काम केलं. खामोशियांमधील त्यांनी साकारलेल्या 60 वर्षांच्या आजीच्या भूमिकेचं कौतुकही झालं.
याशिवाय ‘प्यार का दर्द है मीठा मीठा, प्यारा प्यारा’, ‘मेरे रंग मे रंगनेवाली’ या मालिकांमध्येही दिसल्या. सुचित्रा यांनी मराठी सिनेमांमध्येही काम केलं आहे. ‘इश्का वाला लव्ह, रमा माधव, ‘मला आई व्हायचंय, ‘फुल 3 धमाल’ या सिनेमात त्या दिसून आल्या. याशिवाय अलीकडेच रिलीज झालेल्या सिंघम, सिंबा या सिनेमातही त्यांनी मराठमोळी व्यक्तिरेखा साकारली.
त्यांची खास लक्षात राहिलेली व्यक्तिरेखा म्हणजे ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ मधली सुमित्रा भोसलेची. सुचित्रा यांनी अभिनयासोबत निर्मिती क्षेत्रातही पाऊल ठेवलं आहे. ‘नांदा सौख्य भरे’, ‘लक्ष्य’ यांसारख्या मालिकांची निर्मितीही त्यांनी केली आहे. पीपिंगमून मराठीकडून सुचित्रा बांदेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा....