By  
on  

Fatteshikast Trailer: एक लाख गनिमांना पुरुन उरणार फक्त 90 हजार जिगरबाज मावळे

शत्रुवर तो बेसावध असताना हल्ला करून पळता भुई थोडी करणे ही युद्धनीती छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या हयातीत वापरली. नेमकी हिच युद्धनिती पडद्यावर मांडण्यात दिग्दर्शक दिग्द्पाल लांजेकर यशस्वी ठरले आहेत. त्यांच्या ‘फत्तेशिकस्त’ या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये सिनेमातील भव्यता आकर्षित करतेच. पण शिव युद्धनितीचा थरारही जाणवतो.

 

या सिनेमात मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, निखिल राऊत, आस्ताद काळे, तृप्ती तोरडमल, रमेश परदेशी, नक्षत्रा मेढेकर, हरीश दुधाडे, अजय पुरकर, अंकित मोहन, समीर धर्माधिकारी, मृण्मयी देशपांडे अशी तगडी स्टारकास्ट आहे. यापैकी मृणाल कुलकर्णी जिजाऊंच्या भूमिकेत दिसणार आहे तर मृण्मयी देशपांडे केशरच्या भूमिकेत दिसून येत आहे.

या सिनेमाचं दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केलं आहे. विशेष म्हणजे ते ही या सिनेमात अभिनय कौशल्य दाखवताना दिसतील. हा रोमांचक सिनेमा 15 नोव्हेंबरला रसिकांच्या भेटीला येत आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive