रात्रीस खेळ चाले मधील नाईकांच्या वाड्यावर ज्यांच्या नावाची दहशत आहे, अशा आण्णा नाईकांचा म्हणजेच माधव अभ्यंकर यांचा आज वाढदिवस आहे. भेदक, घारे डोळे, उग्र हावभाव यामुळे आण्णा नाईक यांनी मालिकेतच नव्हे प्रेक्षकांच्या मनातही खास जागा निर्माण केली आहे. माधव यांनी ‘विश्वविनायक’ या सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं.
त्यानंतर ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकातही भूमिका साकारली. अनेक मराठी सिनेमांमधून माधव यांनी स्वत:च्या अभिनयाची छाप सोडली आहे. ‘या गोल गोल डब्यातला’ सुरज्या, पोश्टर गर्ल, ध्यानीमनी, शेंटिमेंटल, फाईट, आसूड, जजमेंट्ल यांसारख्या सिनेमातून माधव रसिकांच्या भेटीला आले. पण माधव यांना रातोरात प्रसिद्धी मिळाली ती आण्णा नाईकांच्या व्यक्तिरेखेमुळे.
आण्णांच्या भूमिकेसाठी एका महिन्यात त्यांनी सात ते आठ किलो वजन कमी केलं होतं. यादरम्यान त्यांनी कडक डाएट प्लॅन आखला होता. तसंच महत्त्वाचं म्हणजे पुण्यात अनेक वर्ष राहत असल्याने मालवणी भाषेसाठी खुप मेहनत घेतली. नाटकं, वाचन यांचा आधार घेतला. कोणतीही भूमिका असो ती परिपूर्ण साकाराय्चा ध्यास असलेल्या माधव अभ्यंकरांना पीपिंगमून मराठीकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा....