By  
on  

अबब ! 'देवाक काळजी' 24 तासांत केलं 4 गाण्यांचं रेकॉर्डींग

मराठी चित्रपट सृष्टित नेहमीच वेगळे विषय, वेगळ्या संकल्पना येताना दिसत आहेत. संकल्पने सोबतच काम ही तेवढेच दर्जेदार होत आहेत. नुकताच आगामी मराठी चित्रपट 'देवाक काळजी'चा संगीतमय मुहूर्त करण्यात आला. ह्या मुहूर्ताचे विशेष म्हणजे संगीत दिग्दर्शक श्रेयश आंगणे ह्यांनी तब्बल २४ तासांत ४ गाण्यांचे रिकॉर्डिंग पूर्ण केले आहे.  श्रेयश ह्यांनी अगोदर गावठी, ट्रकभर स्वप्नं, तिचा उंबरठा ह्या चित्रपटांसाठी संगीत दिलेले आहे. देवाक काळजी चित्रपटासाठी  श्रेयशने स्वतः २ गाणी गायली असून इतर दोन गाणी आनंद शिंदे आणि इत्यादी ह्यांच्या मधुर आवाजात सुरबद्ध करण्यात आली आहे.

ह्या मुहूर्तावेळी संगीत दिग्दर्शक श्रेयश ह्यांनी आपले मत प्रकट करत म्हटले "चित्रपटचा आत्मा चित्रपटाच्या कथेसह संगीतात ही असतो. दोघे एकमेकांना पूरक असावे लागतात. माझ्या कारकिर्दीतील देवाक काळजी हा चित्रपट खुप महत्त्वपूर्ण आहे. चित्रपटाचे संगीत खुप छान व दर्जेदार झाले असून प्रेक्षकांनाही ते नक्की आवडेल अशी माझी आशा आहे. रिकॉर्डिंग २४ तासात पूर्ण झाले असले तरी मी ह्या ४ गाण्यांचे कम्पोजिशन, ट्रेकमेकिंग तन्मयतेने मागील अडीच महिन्यां पासून करत होतो.

सिग्नेचर टून्स निर्मित चित्रपट देवाक काळजी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा श्री.प्रशांत खेडेकर यांच्याकड़े असून लेखन श्री.निखिल चंद्रकांत पाटिल ह्यांचे आहे. सिनेमॅटोग्राफ़ी हरेश सावंत यांच्या नजरेतून पडद्यावर उतरणार आहे , तर नृत्यदिग्दर्शन अमित बाइंग करणार आहेत.

'देवाक काळजी' हा चित्रपट एक संगीतमय प्रेम कथा असून चित्रपटात अजिंक्य राउत , दिव्या पुगांवकर , श्रमेश बेटकर मुख्य भूमिकेत असून नागेश मोर्वेकर, नरेंद्र केरेकर, सागर जाधव आणि डॉ बाबु तडवी हे कलाकार सहायक भूमिकेत दिसतील. चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरु होणार असून , देवाक काळजी पुढील वर्षी म्हणजेच  २०२० मध्ये प्रदर्शित होत आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive