मराठी सिनेसृष्टीतील सुंदर आणि चुलबली अभिनेत्री अशी प्रार्थना बेहरेची ओळख आहे. काही वर्षांपूर्वी एकामागून एक सिनेमांमधून झळकणारी प्रार्थना सध्या फार निवडक सिनेमांमधूनच प्रेक्षकांसमोर येतेय. ती दोन वर्षापूर्वीच अभिषेक जावकरसोबत लग्नबंधनात अडकली. अभिषेक दाक्षिणात्य सिनेमामंधील प्रसिध्द डिस्ट्रीब्युटर आहे. पण सध्या लंडनमध्ये आपल्या आगामी सिनेमाच्या शूटींगमध्ये व्यस्त असलेली प्रार्थनाची अवस्था पतीच्या विरहात ' तुझ्याविना...' अशीच झाली आहे. ती तिथे अभिषेकला प्रचंड मिस करतेय. तिला कधी एकदा मुंबईत येऊन अभिषेकला भेटतोय असंच झालं आहे. इतकंच नाही तर ती आपलं घर व कुटुंबियांनासुध्दा मिस करतेय.
प्रार्थना बेहरेची प्रमुख भूमिका असलेला ती अॅण्ड ती हा सिनेमा अलीकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.आता सर्वांनाच अभिनेत्री प्रार्थनाच्या आगामी प्रोजेक्टची उत्सुकता लागून राहिली आहे.
पवित्र रिश्ता या हिंदी मालिकेतून अभिनयात पदार्पण करणा-या प्रार्थनाने आत्तापर्यंत मितवा, मिस्टर आणि मिसेस सदाचारी, रेडीमिक्स,कॉफी आणि बरंच काही, जय महाराष्ट्र ढाबा भतिंडा, मस्का, मि. अॅंड मिसेस सदाचारी, लव्ह यू जिंदगी, फुगे आदी या सिनेमांमधून नायिका साकारली ाहे.