आयुष्यात संकटं आल्यावर माणूस त्यातून बाहेर पडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत असतो. पण अनेकदा संकटातून सुखरुप बाहेर पडण्यासाठी भगवंताचं सहाय्य घ्यावं लागतं. ‘फत्तेशिकस्त’ या सिनेमातील ‘हेचि येल देवा नका’ या गाण्यात देखील असाच प्रसंग गुदरलेला दिसत आहे. स्वराज्यावर आलेलं संकंट संत तुकारामांच्या अंभगातून सिनेमाच्या मेकर्सनी प्रेक्षकांसमोर आणलं आहे. संत तुकारामांच्या अभंगावर देवदत्त बाजी यांनी संगीतसाज चढवला आहे.
तर अवधुत गांधी यांनी गायलं आहे. शिवरायांच्या गनिमी कावा या युद्धनितीने भल्याभल्यांची झोप उडवली. याच तंत्रावर बेतलेला 'फत्तेशिकस्त' हा सिनेमा घेऊन दिग्पाल लांजेकर रसिकांच्या भेटीला आले आहेत. मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, निखिल राऊत, आस्ताद काळे, तृप्ती तोरडमल, रमेश परदेशी, नक्षत्रा मेढेकर, हरीश दुधाडे, अजय पुरकर, अंकित मोहन, समीर धर्माधिकारी, मृण्मयी देशपांडे हे कलाकार आहेत. हा सिनेमा 15 नोव्हेंबरला रसिकांच्या भेटीला येणार आहे.