By  
on  

अभिनेता जितेंद्र जोशीने या खास व्यक्तीच्या भेटीचा किस्सा शेअर केला

व्यक्ती अनेकदा चाकोरी बाहेरच्या घटना घडल्या की निशब्द होऊन जातो. अभिनेता जितेंद्र जोशीच्या बाबतही असच काहीसं घडलं आहे. सध्या मामी फिल्म फेस्टीव्हल सुरु आहे. यावेळी जितेंद्र एका आवडत्या व्यक्तीला भेटला. ती व्यक्ती म्हणजे अभिनेत्री दीप्ती नवल.

 

 

या भेटीचा किस्सा जितेंद्रने सोशल मिडियावर शेअर केला आहे. या भेटीला कॅप्शन देताना तो म्हणतो, ‘इतनाही मुझे कहना है की चुप ही हु मै या भेटीबद्द्ल आता काय बोलू. माझ्याकडे आता शब्द नाहीत बोलण्यासाठी. दीप्ती नवल या माझ्या आवडत्या अभिनेत्री आहेत. हा फोटो विक्रम मोटवानी सरांनी काढला आहे.

जितेंद्र आणि दीप्ती नवल यांची भेट मामी फिल्म फेस्टीवलमध्ये झाली. जितेंद्र जोशी उत्तम अभिनेता तर आहेच याशिवाय संवेदनशील कवीही आहे याचा प्रत्यय तो वेळोवेळी त्याच्या कवितांमधून देत असतो.

Recommended

PeepingMoon Exclusive