दिवाळीला सणांचा राजा म्हणतात. दिवाळीतील प्रत्येक दिवशी हरेक नातं साजरं करता येतं. त्यातील आणखी महत्त्वाचा आणि दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज. भावांनी कपाळावर टिळा मिरवण्याचा आणि बहिणींनी हक्काने वसूल करण्याचा दिवस म्हणजे भाऊबीज. खरंतर भाऊ बहिणीच्या आंबड्गोड नात्याची गोडी अवीट असते. एरवी बहिणीला चिडवण्यात आनंद घेणारा भाऊ तिच्या साठी जगासमोर देखील उभा ठाकतो. मराठी सिनेमातही असे भाऊ- बहिणीच्या बंधावर आधारलेले नवे जुने सिनेमे आहेत. त्यातील निवडक सिनेमे तुम्ही यावर्षीच्या भाऊबीजेला तुमच्या भावंडासोबत आवर्जुन पाहा.. ...
...
दे धक्का:
या सिनेमातील किसना आणि सायलीची निरागस केमिस्ट्री सगळ्यांनाच खुप आवडली. बहिणीला वेळोवेळी सांभाळून घेणारा, तिच्यासाठी कायम ढाल बनणारा भाऊ अभिनेता सक्षम कुलकर्णीने साकारला होता. तर गौरी वैद्यने सायली साकारली होती.
हॅपी जर्नी:
या भाऊ-बहिणीची जगावेगळी स्टोरी प्रत्येकालाच भावली. या सिनेमाला आजच्या जनरेशनचा टच होता तसेच भावनिक किनारही होती. त्यामुळे प्रत्येक वयोगटाला हा सिनेमा हवाहवासा वाटतो. अभिनेता अतुल कुलकर्णी व अभिनेत्री प्रिया बापट या जोडीच्या भाऊ-बहिणीची गोष्ट तुम्हाला आपल्याच घरातील वाटेल.
एलिझाबेथ एकादशी:
भाऊ-बहिण एकमेकांचे क्राईम पार्टनरही असतात. एलिझाबेथ एकादशी मुक्ता आणि ज्ञानेश या भावंडांची जोडीही त्यामुळेच हटके ठरते. हुशार आणि चुणचुणीत असलेली जोडी तुम्हालाही तुमच्या लहानपणाची आठवण करून देईल यात शंका नाही.
दुनियादारी:
प्रीतम आणि शिरीनची 80 च्या दशकातील ग्लॅमरस केमिस्ट्री प्रत्येकालाच आवडली. बहिणीला जपणारा प्रीतम यात अभिनेता सुशांत शेलारने रंगवला होता.
खारी बिस्कीट:
अंध बहिण आणि तिला जीवापाड जपणा-या भावाची ही गोष्ट प्रत्येकालाच हळवं करणारी आहे. खारीसाठी बिस्कीट आणि बिस्कीटसाठी खारी म्हणजे जीव की प्राण. बहिण भावाच्या या आगळ्या जोड-गोळीची ही गोष्ट 1 नोव्हेंबरला रसिकांच्या भेटीला येणार आहे.