By  
on  

पोलिस आले आण्णा नाईकांच्या घरी, नक्की काय घडणार आता?

रात्रीस खेळ चाले मालिकेत येत्या एपिसोडमध्ये रसिकांना नवं वळण पाहायला मिळणार आहे.  ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेच्या प्रीक्वेलही रसिकांच्या पसंतीस उतरला आहे. या मालिकेत येणारे नवीन ट्वीस्ट आणि धक्के मालिकेला आणखी रंजक बनवत आहे. पण या सगळ्यावर वरताण आहे ती आण्णा आणि शेवंताची केमिस्ट्री. आण्णा आणि शेवंताच्या अनैतिक संबंधांबद्दल शोभाला कळतं.

 

 

यासाठी ती शेवंतावर हल्ला करण्याचा प्रयत्नही करते. आण्णांच्या हे लक्षात येतं. ते शोभाला गायब करण्याचं ठरवतात.  आण्णा एक जड पेटी भुयारात सरकवतात. या पेटीमधून कण्हण्याचा आवाज देखील येत असतो. यानंतर नाईकांच्या घरी शोभाची चौकशी करण्यासाठी पोलिस आले आहेत. यादरम्यान पांडू मात्र एक जागा पोलिसांना खोदुन दाखवत असतो. आता नेमकं यात काय सापडणार? आण्णांची पापं जगासमोर येणार का हे लवकरच समजेल.

Recommended

PeepingMoon Exclusive