‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’च्या कथेतील नायिकेला तिचं आख्खं आयुष्य बदलून टाकायचं होतं. तिने पेहराव बदलला, तिने घर बदललं, तिने नोकरी बदलली, तिने ऍटिट्युड बदलला, तिने नवरा बदलला, तिने मित्र बदलला, तिने तिचं जगणं बदललं पण तिचं जगणं बदललं का? स्वत:चं आयुष्य नव्याने जगण्यासाठी धडपड करणारी स्त्री आणि भावनिकदृष्ट्या आई आणि बायकोच्या नात्यात अडकलेल्या आईची भूमिका सई ताम्हणकरने साकारली आहे.
सईसह या सिनेमात निखिल रत्नपारखी आणि राजेश श्रृंगारपुरे यांच्या देखील प्रमुख भूमिका आहेत.
‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’च्या या कलाकारांच्या भूमिकेची ऑन स्क्रिन झलक प्रेक्षकांनी ' ट्रेलरमधून पाहिली आहे.
शूटिंग दरम्यान टिपलेले पडद्यामागील काही क्षण आता प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. प्रेक्षकांना आता काही दिवसच प्रतिक्षा करावी लागणार आहे कारण येत्या २२ नोव्हेंबरला ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय.