मराठी सिनेमे सध्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सिनेममहोत्सवात स्वतःची छाप पाडत आहेत. अशाच एका मराठी सिनेमाने सिंगापुर दक्षिण आशियाई सिनेमहोत्सवात बाजी मारली आहे. 'माई घाट: क्राइम नं. १०३/२००५' या मराठी सिनेमाने या सिनेमहोत्सवात 'सर्वोत्कृष्ट सिनेमा' हा पुरस्कार पटकावला आहे. तर नुकत्याच 'न्यु याॅर्क सिनेमहोत्सवात' उषा जाधवला 'माई घाट क्राईम नं. १०३/२००५'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार
एका आईने पोलीस यंत्रणेविरुद्ध दिलेल्या लढ्याची संवेदनशील कथा या सिनेमातुन मांडण्यात आली आहे. चारवेळा राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारे अनंत महादेवन यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 'सिंगापुर दक्षिण आशीयाई सिनेमहोत्सवात' 'सर्वोत्कृष्ट सिनेमा', 'सर्वोत्कृष्ट एडिटींग' आणि 'सर्वोत्कृष्ट सिनेमेटाॅग्राफी' हे तीन पुरस्कार या सिनेमाने पटकावले आहेत.
'माई घाट' सिनेमामध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेती उषा जाधव प्रमुख भुमिकेत आहे. तिच्यासह सुहासिनी मुळ्ये, कमलेश सावंत, डाॅ. गिरीश ओक, विभावरी जोशी आणि विवेक चाबुकस्वार यांच्या महत्वपुर्ण भुमिका आहेत.