'शाळा' सिनेमातील मुकुंद जोशी म्हणजेच अंशुमन जोशीबद्दल या गोष्टी जाणुन घ्या

By  
on  

सुजय डहाके दिग्दर्शित शाळा सिनेमा तुम्हाला आठवत असेलच. जोशी आणि शिरोडकर यांची प्रेमकहाणी सर्वांना भावुन गेली. या सिनेमातुन सुजय डहाके सारखा दिग्दर्शक मराठी सिनेसृष्टीला मिळाला तर केतकी माटेगावकरसारखी गोड अभिनेत्री मिळाली. पण या सिनेमात मुकूंद जोशीची भुमिका साकारणारा अभिनेता सधा कुठे असतो हा प्रश्न तुम्हा सर्वांच्या मनात असेल. तर मुकुंद जोशीची भुमिका साकारणारा अभिनेता अंशुमन जोशी सध्या अनेक मराठी सिनेमांमध्ये झळकत आहे. 

'शाळा' मधला बालकलाकार असुनही त्याने स्वतःमधल्या अभिनयक्षमतेची जाणीव करून दिली. 'शाळा' नंतर अंशुमन जोशीनं चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित 'आजचा दिवस माझा' या सिनेमात छोटीशी भुमिका साकारली. 

त्यानंतर पर्ण पेठेसोबत अंशुमन 'फोटोकाॅपी' या सिनेमात झळकला. या सिनेमातील त्याचा हटके लुक सर्वांना आवडला. 

अलीकडेच अंशुमन अमेय वाघच्या 'फास्टर फेणे' सिनेमातही झळकला होता. 

मुळच्या सोलापुरच्या असलेल्या अंशुमनला मिलिंद बोकील यांच्या 'शाळा' कादंबरीवर आधारीत सुजय डहाके दिग्दर्शित 'शाळा' सिनेमामधील अभिनयासाठी अनेक पुरस्कार मिळाले. अंशुमनने मराठी रंगभूमीवर सुद्धा काम केले आहे.

Recommended

Loading...
Share