By  
on  

अभिनेत्री प्रार्थना बेहरेचा हा ग्लॅमरस अंदाज एकदा पाहाच

अभिनेत्री प्रार्थना बेहरे नेहमीच आपले विविध फोटोशूट करुन चाहत्यांना घायाळ करत असते. आता नुकतंच तिने एक नवं फोटोशूट करुन पुन्हा एकदा चाहत्यांना सरप्राईज दिलं आहे. नुकतंच तिने एक ब्लॅक आणि व्हाईट फोटोशूट पण ग्लिटरी अवतारात केलं आहे. यात प्रार्थना खुपच ग्लॅमरस दिसतेय. विविध मूडस आणि वेगळ्या अंदाजात तिने  हे फोटोशूट केलं आहे. 

प्रार्थनाचं आगामी प्रोजेक्ट लवकरच रसिकांच्या भेटीला येत आहे. पण हा सिनेमा आहे की वेबसिरीज हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे. नुकतंच प्रार्थना आपल्या पतीसह म्हणजेच अभिषेक जावकरसह लग्नाच्या दुस-या वाढदिवसानिमित्त परदेसात हॉलिडे एन्जॉय करुन आली. ती दोन वर्षापूर्वीच अभिषेक जावकरसोबत लग्नबंधनात अडकली. अभिषेक दाक्षिणात्य सिनेमामंधील प्रसिध्द डिस्ट्रीब्युटर आहे.  गोव्यामध्ये प्रार्थनाच्या डेस्टिनेशन वेडिंगला अनेक मराठी कलाकारांनीही उपस्थिती दर्शवली होती.

प्रार्थनाने आतापर्यंत 'मितवा', 'मिस्टर आणि मिसेस सदाचारी', 'रेडीमिक्स','कॉफी आणि बरंच काही',  या सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. काही दिवसांपुर्वीच ती ‘ती & ती’ सिनेमात दिसली होती. यात तिच्यासोबत पुष्कर जोग आणि सोनाली कुलकर्णी देखील होते. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून तिने  मालिकाविश्वात पदार्पण केलं होतं. आता ती वेबप्लॅटफॉर्मवर कधी येते याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना आहे

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive