Birthday Special : बोल्ड आणि बिनधास्त नेहा पेंडसेची यंदा लगीनघाई

By  
on  

 मराठीसोबतच हिंदीतही  आपल्या अभिनयाची छाप पाडणारी बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणजे नेहा पेंडसे. हिंदी बिग बॉसच्या मागच्या सीझनमध्येही नेहाने आपली चमक दाखवून दिली. त्यापूर्वी 'मे आय कम इन मॅडम' या  हिंदी मालिकेतील तिची बोल्ड भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली. सध्या नेहा भलतीच चर्चेत आहे, ते म्हणजे तिच्या साखरपुड्याच्या चर्चेमुळे, नेहा व्यावसायिक शार्दुल सिंगला डेट करतेय.  

काही महिन्यांपू्र्वी इन्स्टावर शेअर केलेल्या फोटोमध्ये नेहा आणि शार्दुल एकमेकांच्या डोळ्यात पाहात आहेत. याचवेळी नेहाच्या हातात अंगठीही चमकत आहे.

शार्दुल आणि नेहा बराच काळ एकमेकांना ओळखत असल्याचं शार्दुलच्या इन्स्टा अकाउंटवरील फोटोमधून दिसून येत आहे. त्याच्या घरातील कार्यक्रमांनाही तिची हजेरी दिसून येत आहे. आता ही जोडी लग्नाच्या बंधनात कधी अडकते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. 

नेहाने चाईल्ड आर्टिस्ट म्हणून करीअरला सुरुवात केली होती. याशिवाय ती 'हसरते' या हिंदी मालिकेतही दिसली होती. झी मराठीवरील 'भाग्यलक्ष्मी' मालिकेतूनही तिने आपला ठसा उमटवला. 

Recommended

Loading...
Share