By  
on  

Video : तरुणाई भावणारं ‘विक्की वेलिंगकर’ चं 'डा रा डिंग डिंग ना'.. गाणं पाहा

‘विक्की वेलिंगकर’ चित्रपटातील गायक अवधूत गुप्ते आणि ओमकार पाटील यांच्या आवाजातील 'टीकिटी टॉक' हे गाणेदेखील प्रदर्शित करण्यात आले होते यालाही प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. आता विक्की वेलिंगकर सिनेमाचे ‘डा रा डिंग डिंग ना’ हे दुसरे गाणे चित्रपटाच्या निर्मात्यांकडून नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. विक्की वेलिंगकर या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, स्पृहा जोशी, विनिता खरात, केतन सिंग, जुई पवार, गौरव मोरे, संग्राम समेळ आणि रमा जोशी या कलाकारांच्या महत्वाच्या भूमिका असून हा चित्रपट ६ डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.

विक्की वेलिंगकर’ चित्रपटाच्या या नवीन गाण्याचे "साज अशी कि मन जुळता थांबे ना, वाऱ्यावरी, पाय खाली पण पडे ना ,डोन्ट स्टॉप टू ट्याप युअर फीट ऑन द फ्लोर,  मन बोले नाचू मोर मोर मोर, उद्यावरी आहे तुझा माझा कसला जोर, डा रा  डिंग  डिंग  ना" हे बोल असून ‘डा रा डिंग डिंग ना’ हे गाणे पीयूष अंभोरे याने गायले आणि लिहिले असून  मनन मुंजाळ याने संगीतबद्ध केले आहे.

 

या गाण्यामध्ये सोनाली कुलकर्णी म्हणजेच विक्की कोणाचा तरी शोध घेताना दिसत असून या गाण्यात मास्क मॅन देखील दिसत आहे ,त्याशिवाय या गाण्याचा संपूर्ण मूड पूर्णपणे क्लब प्रकारचा असून हे गाणे तरुणाईला ठेका धरायला लावेल आणि तरुण मुलामुलींना हे गाणे नक्की आवडेल आणि हे ' डा रा  डिंग  डिंग  ना ' गाणे ऐकल्यानंतर  प्रेक्षकांमध्ये ‘विक्की वेलिंगकर’ या सिनेमाची उत्कंठा अधिकच वाढेल यात काही शंका नाही.  

मनन मुंजाळ आणि पीयूष अंभोरे म्हणाले, हे गाणे तयार करताना खूप मज्जा आली या गाण्याचा आमच्यासाठी अविस्मरणीय असा अनुभव होता या गाण्याचा मूड क्लब प्रकारचा  असून हे गाणे तरुणाई ला नक्की आवडेल असे आम्हाला वाटते या सिनेमासाठी काम करण्याची  संधी सौरभ वर्मा आणि जिसिम्सने आम्हाला दिली याबद्दल आम्ही त्यांचे  आभार मानतो "

‘विक्की वेलिंगकर’ हा सिनेमा येत्या ६ डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive