पाहा Poster: संतोष जुवेकर जुळवत आहे ‘36 गुण’, पण नक्की कोणासोबत?

By  
on  

अभिनेता संतोष जुवेकर आता नव्या सिनेमासह रसिकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. आगामी 36 गुण या सिनेमातून तो रसिकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत अभिनेत्री पुर्वा पवार झळकणार आहे.संतोषसोबत या सिनेमात पुष्कर श्रोत्री देखील झळकणार आहे. नुकताच या सिनेमाचा एक व्हिडियो व्हायरल झाला होता. यात पुष्कर आणि संतोष एकच गाणं वेगवेगळ्या अंदाजात म्हणताना दिसत होते. 

 

आता या सिनेमाचं नवीन पोस्टर समोर आलं आहे. यात एक फॉर्मल ड्रेसमधील मुलगा आणि सिगरेट पिणारी मुलगी एकमेकांसमोर थांबले आहेत असं दिसत आहे. हा सिनेमा समीत कक्कड दिग्दर्शित करत आहेत. समीत यांनी यापुर्वी 'हाफ तिकीट', 'आयना का बायना' यांसारख्या सिनेमांचे दिग्दर्शन केलं आहे. साद भेंडे यांनी ‘३६ गुण’ चित्रपटाचे छायांकन केले आहे तर पराग संखे यांनी लाईन प्रोड्युसरची जबाबदारी सांभाळली आहे.

 

 

Recommended

Loading...
Share