अभिनेता सुव्रत जोशी बनला फुलवाला, वाचा सविस्तर

By  
on  

आतापर्यंत विविध चित्रपट, मालिकांतून आपल्या अभिनयाची छाप उमटवलेला अभिनेता सुव्रत जोशी आता फुलवाल्याच्या भूमिकेत दिसणार आहे. शंतनू गणेश रोडे  दिग्दर्शन करत असलेल्या "गोष्ट एका पैठणीची''या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू झालं आहे. 

प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेच्शो फिल्म्स गोष्ट एका पैठणीची'' या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. अभिनेत्री सायली संजीव या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सायलीसह सुव्रत जोशीचीही अतिशय वेगळी आणि महत्त्वाची भूमिका आहे. भोर इथं या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू आहे. फुलवाल्याच्या भूमिकेसाठी फुलपुडी बांधण्यापासून  ते बुके तयार करण्यापर्यंत काही खास कौशल्यं सुव्रतनं शिकून घेतली आहेत. 

'माझ्या रोजच्या जगण्यापेक्षा काहीतरी वेगळं असलेल्या, मी कधीही अनुभव न घेतलेल्या विश्वातल्या भूमिका मला करायला आवडतात. कारण अभिनेता म्हणून त्यात आव्हान असतं. या  चित्रपटातील फुलवाल्याची भूमिकाही तशीच आहे. या भूमिकेसाठी कित्येक फुलवाल्यांचं तासंतास  निरीक्षण केलं. फुलपुडी बांधणं, झटपट हार करणं, बुके तयार करणं शिकून घेतलं. ही कामं एका अर्थानं कलाच आहे असं मला वाटतं. "गोष्ट एका पैठणीची''
या चित्रपटाची कथा अतिशय सुंदर आहे. या चित्रपटाचा मी एक भाग आहे हा आनंदाचा आणि समृद्ध करणारा अनुभव आहे,' असं सुव्रतनं सांगितलं.

Recommended

Loading...
Share