'आटपाडी नाईट्स'चे नवीन पोस्टर पाहिले का?

By  
on  

बहुचर्चित ‘आटपाडी नाईट्स’ या चित्रपटाच्या धम्माल टीजर नंतर चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. मायदेश मीडिया आणि सुबोध भावे प्रस्तुत, नितिन सिंधुविजय सुपेकर लिखित – दिग्दर्शित ‘आटपाडी नाईट्स’च्या या नविन पोस्टर मध्ये बंद दाराआडच्या काही गोष्टी उघड झाल्या असून त्यात प्रणव रावराणे आणि सायली संजीव ही जोडी वर – वधुच्या रुपात प्रेक्षकांसमोर आली आहे.

‘आटपाडी नाईट्स’च्या या नव्या पोस्टरवरून वसंत आणि हरिप्रिया यांचा नुकताच विवाह झाल्याचे समजते. नवरदेवाच्या वेशातील प्रणव आणि नववधूच्या वेशात अतिशय सुंदर दिसणारी सायली दारासमोर उभे आहेत. प्रणवच्या उजव्या बाजूला एक लाकडी स्टूल आहे, त्यावर दुधाचा ग्लास ठेवण्यात आलेला आहे, त्यांच्या बाजूला पानाचा विडा सुद्धा आहे. तर सायलीच्या डाव्या बाजूला लग्नात आलेले काही गिफ्ट्स ठेवल्याचे दिसते. या चित्रपटाच्या टीजरच्या शेवटी 'पण एक प्रॉब्लेम आहे महाराज, तुमचा रात्रीचा काहीतरी घोळ आहे' हे वाक्य आणि आता आलेले नवीन पोस्टर यातून चित्रपटाबद्दलची उत्कंठा अधिक ताणली गेली आहे.

मायदेश मीडिया निर्मित 'आटपाडी नाईट्स' मध्ये प्रणव रावराणे, सायली संजीव, सुबोध भावे, संजय कुलकर्णी, छाया कदम, समीर खांडेकर, आरती वडगबाळकर, योगेश इरतकर, विठ्ठल काळे, जतिन इनामदार, प्रशांत जाधव, शितल कलापुरे, चैत्राली रोडे, श्वेता परदेशी, बालकलाकार ओम ठाकूर यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाला विजय गावंडे,  सिद्धार्थ धुकटे यांचे संगीत लाभले असून नारायण पुरी,  कमलेश कुलकर्णी यांची गीते आहेत.

‘आटपाडी नाईट्स’ची कथा एका संवेदनशील सामाजिक विषयावर खुमासदार शैलीत भाष्य करणारी असल्याचे समजते. ‘आटपाडी नाईट्स’ हा चित्रपट येत्या २७ डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Recommended

Loading...
Share