By  
on  

या स्टायलिश अभिनेत्रीचा भावी पती बनला स्टयलिस्ट

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर सोशल मिडियावर स्टायलिश फोटो कायमच फॅन्ससोबत शेअर करत असतात. हे लव्हबर्ड्स अलीकडेच ऑस्ट्रेलियात शुटिंग निमित्ताने गेले होते. याशिवाय त्यांच्या अंडरवॉटर फोटोशुटलाही नेटिझन्सनी पसंती दर्शवली होती. आताही मितालीने एक खास फोटो शेअर केला आहे. रफल नेक असलेल्या या पिंक गाऊनमध्ये ती कमालीची स्टायलिश दिसत आहे. 

 

 

फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने या ड्रेसच्या स्टायलिस्टचं नावही लिहिलं आहे. हे नाव आहे मितालीचा भावी नवरा सिद्धार्थ याचं. मितालीने स्टायलिस्टमध्ये हे नाव लिहिलं आहे. ‘Styled by my love and 'Haushi' new stylist @sidchandekar ’या कॅप्शनखाली तिने तिच्या लाडक्या स्टायलिस्टचं नाव लिहिलं आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive