By  
on  

'गुड न्यूज' ची बॉक्स ऑफीसवर कोटीच्या कोटी उड्डाणे

सुपरस्टार अक्षय कुमार , करिना कपूर, कियारा अडवाणी आणि दिलजीत दोसांज यांचा नुकताच प्रदर्शित झालेला 'गुड न्यूज' हा बहुचर्चित सिनेमा सध्या बॉक्स ऑफीसवर कोटीच्या कोटी उड्डाणे घेत आहे. प्रेक्षकांची मनं जिकण्यात ही चौकडी यशस्वी ठरल्याचं यांच्या बॉक्स ऑफीस कलेक्शनववरुन दिसून येतंय. अक्षयचा तर हा सिनेमा या वर्षातला लागोपाठ चौथा सुपरहिट सिनेमा ठरला आहे. 

'गुड न्यूज' या सिनेमाने पहिल्याच दिवशी 17.56 कोटींची कमाई करत शानदार ओपनिंग केली. विकेंडला गुड न्यूजने  21.78 कोटी तर रविवारी 25.65 कोटींचा गल्ला जमवला. तीन दिवसांत या सिनेमाने जवळपास 64.99 कोटींचा गल्ला जमवला. 
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive