मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने सर्वांची मनं जिंकणारा लय भारी अभिनेता रितेश देशमुख नेहमीच सोशल मिडीयावरुन चाहत्यांच्या संपर्कात असतो. आपल्या आयुष्यातील प्रत्येक घडामोडी तो चाहत्यांसोबत शेअर करतो. गेले आठवडाभर रितेश आणि त्याची पत्नी अभिनेत्री जेनेलिया देशमुख हे आपल्या रयाल व रिआन या दोन्ही मुलांसह गावी लातूरला राहिले होते. नवीन वर्षाचं स्वागतसुध्दा या चौकोनी कुटुंबाने निसर्गरम्य वातावरणात केले. त्याने आपल्या कुटुंबातर्फे सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
रितेश देशमुखच्या या पोस्टवरुनच त्याची मातीशी नाळ कशी जोडली गेलीय हे पाहायला मिळालं.