Hotness Alert! रसिका सुनीलचे ह्या मादक अदा पाहून तुम्ही व्हाल फिदा

By  
on  

माझ्या नव-याची बायको मालिकेतून शनाया म्हणून छोट्या पडद्यावर धुमाकूळ घालणारी अभिनेत्री रसिका सुनिल सध्या सोशल मिडीयावरसुध्दा धुमाकूळ घालतेय. नुकतंच रसिकाने एक बोल्ड फोटोशूट केलं आहे, तुम्ही तर तिच्या ह्या अदा पाहून नक्कीच फिदा व्हाल. 

रसिकाच्या या मादक अदा तिच्या फॅन्ससाठी चर्चेचा विषय ठरत आहे. काळ्या रंगाचा स्विमसूट तिला अगदी तंतोतत खुलून दिसतोय. जिम मधील चार महिन्यांच्या कठोर मेहनतीनंतर हवा तसा फिटनेस प्राप्त झाल्याचा आनंद तिने सोशल मिडीयावरील पोस्टमधून व्यक्त केला आहे आणि सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

'तु थांबणार नाहीस..........., तु आमच्यासाठी प्रेरणा आहेस....,' असं म्हणत रसिकाच्या  फोटोवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे.

रसिका ही सई ताम्हणकर आणि अमेय वाघ स्टारर गर्लफ्रेंड सिनेमात झळकली होती. आता तिच्या आगामी प्रोजेक्टसची चाहत्यांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे.

 

Recommended

Loading...
Share