मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी मराठमोळी अभिनेत्री उद्योगपती शार्दुल सिंग बयास याच्यासोबत बोहल्यावर चढतेय. नेहा आणि शार्दुल हे आपले नातेवाईक व खास मित्रपरिवार यांच्या उपस्थितीत लग्नबंदनात अडकणार आहेत. 5 जानेवारी रोजी त्यांचा विवाह सोहळ्या पुण्यातील आलिशान हॉटेलमध्ये पार पडतोय. हा मोठा भव्यदिव्य सोहळा असणार असूनअनेक बड्या हस्ती या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचं बोललं जात आहे. काल 3 जानेवारी रोजी त्यांचा संगीत सोहळा थाटामाटात पार पडला.
नेहा आणि शार्दुलच्या संगीत सोहळ्यातला एक रोमॅंटीक अंदाज या फोटोंमधून पाहायला मिळतोय. नेहाने मल्टीकलर लेहंगा चोली तर शार्दुलनेसुध्दा मल्टीकलरच कुर्ता-पायजमा आणि जॅकेट परिधान केलं होतं. दोघंही यात खुप खुलून दिसत होते. आणखी एक म्हणजे नेहाने लेहंग्यासोबत लाल रंगाची छोटी पर्स अकवली होती आणि ती खुपच लक्षवेधक ठरली.