गेले आठवडाभर मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री नेहा पेंडसेच्या लग्नाची बरीच चर्चा रंगली. नेहा पुण्याची असून तिने पुण्यातील व्यावसायिक शार्दुल सिंग बयाससोबत लग्नगाठ बांधली. फक्त जवळचे नातेवाईक ाणि खास मित्रपरिवार यांच्या उपस्थित लग्नसोहळा पार पडला. पण आता नेहाच्या या भव्य दिव्य लग्नासोहळ्यानंतर तिच्या पतीविषयी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे व त्यामुळे चाहते आणि सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे. तुम्हालासुध्दा ही बातमी वाचून नक्कीच आश्चर्य वाटेल, नेहाचा पती दोन वेळा घटस्फोटीत तर आहेच पण त्याला एका लग्नापासून दोन मुली आहेत.
सिनेसृष्टीत लव्ह अफेअर्स , ब्रेकअप हे काही नवीन नाही. यांबद्दलची अनेक प्रकरणं आपल्याकडे चवीचवीनं चघळली जातात. नेहा आणि शार्दुलच्या लग्नाबाबतसुध्दा आता असाच खुलासा झाला आहे. नेहाने लग्नानंतर प्रथमचच स्पॉटबॉय या वेबपोर्टलला दिलेल्या एक्स्क्ल्युझिव्ह मुलाखतीनुसार, तिचा पती शार्दुल सिंग बयास याचा दोन वेळा घटस्फोट झाला आहे. तसंच वैयक्तिक आयुष्याविषयी तिने अनेक गोष्टी या मुलाखतीत स्पष्ट केल्या.
स्पॉटबॉयच्या माहितीनुसार शार्दुलच्या पहिल्या पत्नींचं नाव अनिता असून तीसुद्दा एक व्यावसायिकच आहे. इतकंच काय तर शार्दुलला दोन मुलीसुध्दा आहेत. रिया आणि आलिया. त्याने 2017मध्ये पत्नीपासून घटस्फोट घेतला. त्यामुळे आता नेहा ही त्याची तिसरी पत्नी आहे.
या मुलाखतीत नेहा आपल्या वैयक्तिक जीवनाबद्दल सांगते, " मी पण याआधी दोन-तीनवेळा रिलेसनशीपमध्ये होते. ब्रेकअपचं दु;ख मी पण पचवलं आहे पण त्यातून बरंच काही शिकले आणि आता खंबीर झाले आहे. शार्दुलने माझ्यापासून काहीच लपवलं नाही त्याने मला लग्नापूर्वीच सर्व गोष्टींची कल्पना दिली आहे. त्याला दोन गोंडस मुली आहेत. त्याने माझ्यापासून कोणतीच गोष्ट लपवली नाही, त्यामुळे त्याच्या पूर्वीच्या लग्नामुळे मला काहीच फरक पडत नाही.