By  
on  

पाहा Video : अमृता खानविलकर म्हणतेय 'अल्बम काढाल काय'

'यूट्यूबवर व्हायरल झाले, १ मिलियनची व्ह्यूअरशीप हाय' असे ढिनचॅक शब्द असलेलं 'अल्बम काढाल काय' हे बहुचर्चित 'चोरीचा मामला' या चित्रपटातलं गाणं सोशल मीडियावर हिट झालं आहे. अतिशय ग्लॅमरस आणि हॉट लुकमध्ये अमृता खानविलकरनं या गाण्यावर ठुमके लगावले आहेत. 

एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट प्रस्तुत आणि स्वरुप स्टुडिओजच्या सहकार्याने सुधाकर ओमाळे, आकाश पेंढारकर, सचिन नारकर,विकास पवार, स्मिता ओमळे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. प्रियदर्शन जाधवनं या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. ३१ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

गायिका शाल्मली खोलगडेनं "अल्बम काढाल काय" हे गाणं गायलं आहे. जितेंद्र जोशीनं लिहिलेलं हे गाणं संगीतकार चिनार महेश यांनी संगीतबद्ध केलं आहे. उडती चाल आणि ढिनचॅक शब्द, अमृता खानविलकरचा ग्लॅमरस लूक हे या गाण्याचं वैशिष्ट्य आहे. सुजीतकुमार गाण्याचे कोरिओग्राफर आहेत. अल्पावधीतच या गाण्याला सोशल मीडियात मोठी लोकप्रियता मिळाली आहे. जितेंद्र जोशी, अमृता खानविलकर,हेमंत ढोमे, अनिकेत विश्वासराव, क्षिती जोग, कीर्ती पेंढारकर अशी दमदार स्टारकास्ट असलेल्या 'चोरीचा मामला' या चित्रपटाविषयी   प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

पाहा video

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive