“परी म्हणू की सुंदरा, तिची तऱ्हा असे जरा निराळी”, ती अमृता खानविलकर मराठमोळी ब्युटी जिचे कित्यके चाहते आहे. तिचा डान्स, तिची अदा, जिच्या स्माईलवर चाहते फिदा आहेत. मात्र अमृता खानविलकरच आता पुन्हा एकदा प्रेमात पडलीय. आणि हे तिने सगळ्या जगासमोर सांगीतलय. चक्क सोशल मिडीयावर फोटो पोस्ट करत अमृता म्हणतेय की ती प्रेमात पडलीय. पण ज्याच्यासोबत तिने फोटो पोस्ट केलाय त्याच्या कुणीही प्रेमात पडेल. कारण तो दुसरा तिसरा कुणीही नसून तो आहे एक पेट डॉग. अभिनेता हेमंत ढोमे आणि क्षिती जोग यांचा पेट डॉग ज्याचे नाव आहे व्यांकू. आणि अमृता खानविलकर या गोंडस डॉगच्या प्रेमात पडलीय.
अमृता त्याच्यासोबतचा फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये म्हणतेय “आणि अशा प्रकारे मी प्रेमात पडलीय, तू माझं हृद्यचं काढून घेतलसं”. हेमंत आणि क्षिती यांच्या घरी येणाऱ्यांना या व्यांकूची भेट घेता येते आणि मग ते अमृताप्रमाणेच त्याच्या प्रेमात पडतात. इन्स्टाग्रामवर या पेट डॉगचं स्पेशल अकाउंटही आहे.
या फोटोचं निमित्त होतं ‘चोरीचा मामला’ या सिनेमाचं. या सिनेमात अमृता खानविलकरसोबत हेमंत ढोमे आणि क्षिती जोग हे दोघेही आहेत. शिवाय अभिनेता अनिकेत विश्वासराव, जितेंद्र जोशी, किर्ती मेहेंदळे अशी कास्ट पाहायला मिळेल.