अभिनय बेर्डेच्या फेक प्रोफाईलवरून फसवणूक, प्रिया बेर्डे यांनी शेअर केली पोस्ट

By  
on  

कलाकारांना अनेकदा फेक अकाउंटमुळे होणा-या त्रासाला सामोरं जावं लागतं. युवा अभिनेता अभिनय बेर्डेच्या बाबतही हेच घडलं आहे. याबाबत त्याची आई व अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी हा खुलासा सोशल मिडियावरून केला आहे. अभिनयच्या फेक अकाउंटवरून एका मुलीची फसवणूक करण्यात आली आहे. नागराज मंजुळेच्या एका सिनेमासाठी बोल्ड अभिनेत्रींची गरज आहे. तू तुझे बोल्ड फोटो पाठव. असा मेसेज त्या मुलीला केला गेला. प्रिया यांना ही बाब समजल्यावर त्यांनी याबाबत अ‍ॅक्शन घेतली आहे. 

 

 

प्रिया यांनी एक मेसेज पोस्ट करत या अकाउंटचा आणि अभिनयचा कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

Recommended

Loading...
Share