By  
on  

प्राजक्ताची फिरायची आणि अख्खं जग बघायची इच्छा होतेय पूर्ण, हे आहे कारण

सोशल मिडीयावर अभिनेत्री प्राजक्ता माळीचे काही फोटो आणि व्हिडीओ चर्चेत आले आहेत. हे फोटो आहेत तिच्या दुबई ट्रीपचे. प्राजक्ता नुकतीच दुबईला जाऊन आली आणि याचं कारण आहे तिचा आगामी प्रोजेक्ट. एका हिंग्लिश ट्रॅव्हल शोचं प्राजक्ता सुत्रसंचालन करणार आहे. हा एक नॉन मराठी शो असून लवकरच प्राजक्ता OTT प्लॅटफॉर्मवर दिसणार असल्याचं तिनं तिच्या पोस्टमध्ये म्हटलयं. आणि याच शोसाठी प्राजक्ताने दुबईतल्या प्रसिद्ध ठिकाणी भेट दिली. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

World’s biggest Aquarium; inside the Mall . #dubai #bollylandsofficial #prajaktamali

A post shared by Prajakta (@prajakta_official) on

यावेळी प्राजक्ताने जगातील सगळ्यात उंच इमारत बुर्ज खलिफालाही भेट दिली आणि तेथील बेस्ट फाउंटेन शो देखील पाहिला. तर जगातील सगळ्यात मोठं एक्वेरियमही तिने दुबईतल्या एका मोठ्या मॉलमध्ये पाहिला. प्राजक्ता माळीची खूप फिरायची आणि अख्खं जग बघायची इच्छा होती. आणि आगामी येणाऱ्या या शोच्या माध्यमातून प्राजक्ताची ही इच्छा पूर्ण होताना दिसतेय असं तिने तिच्या पोस्टमध्ये म्हटलय.

प्राजक्ताने तिच्या सोशल मिडीया अकाउंटवर या ट्रीपचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत.

 

 

 

 

 
 

Recommended

PeepingMoon Exclusive