मराठीतील बोल्ड आणि ब्युटीफुल अभिनेत्रींमध्ये संस्कृती बालगुडे हे नाव आग्रहानं घ्यावं लागतं. नेहमीच स्टायलिश आऊटफिट्सना संस्कृती पसंती देताना दिसते. आपल्या विविध आऊट्फिट मधील फोटोशूट ती नेहमीच चाहत्यांसोबत शेअर करते.तसंच सोशल मिडीयावर सतत सक्रीय असणा-या सेलिब्रिटींपेकी संस्कृती एक आहे. नुकतंच संस्कृतीने एथनिक लुक्स परिधान केलेले तिचे विविध मूड्सचे फोटो शेअर केले आहेत.
निळ्या रंगाच्या साध्या एथनिक कुर्तीसोबत मोठे इअर रिंग्समध्ये संस्कृती खुलून दिसतेय. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी कॉमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव सुरु केला आहे. विविध आऊटफिट्स ट्राय करण्यावर संस्कृतीचा भर असतो. पण या साध्या एतनिक लुकमध्येसुध्दा तिच्या सौंदर्याला चार चॉंद लागले आहेत. तिचा हा सोज्वळ लुक पाहून तुम्ही तिच्या प्रेमात नाही पडलात तरच नवल.
अलीकडेच संस्कृती ‘काळे धंदे’ या वेबसिरीजमध्ये दिसली होती. या सिरीजमध्ये तिच्यासोबत शुभंकर तावडे होता. याशिवाय महेश मांजरेकर यांची या वेबसिरीजमध्ये महत्वाची भूमिका होती. सर्वांना तिच्या आगामी प्रोजेक्टची उत्सुकता लागून राहिली आहे.