By  
on  

सिद्धार्थ जाधवने त्याच्या या खास मित्रांसोबत शेअर केली ही आठवण

अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि प्रियदर्शन जाधव यांनी अलीकडेच जितेंद्र जोशीच्या ‘दोन स्पेशल’ कार्यक्रमात दिसले. यावेळी सिद्धार्थने एक खास आठवण चाहत्यांशी शेअर केली आहे. सिंबा सिनेमा शूट करत असताना सिद्धार्थला रणवीर सिंगने त्याच्या रिसेप्शनला आमंत्रित केलं होतं. ती आठवण सांगताना सिद्धार्थ म्हणतो,

 

 

‘ या कार्यक्रमाचं आमंत्रण आलं त्यावेळी मला खुपच आनंद झाला होता. मी तिथे गेलो त्यावेळी इतक्या लोकांना पाहिलं की ज्यांना भेटण्याची मी फक्त स्वप्नच पाहायचो. पण यावेळी मी त्यांना प्रत्यक्ष पाहात आहोत. त्यावेळी मला स्वप्नातील मादाम तुसांमध्ये असल्यासारखं वाटलं. फक्त फरक इतकाच होता की, यावेळी मी पुतळा झालो होतो आणि पुतळ्यांमध्ये चैतन्य आलं होतं.’ यासोबत सिद्धार्थ आणि प्रियदर्शनने शोमध्ये खुप धमालही केली. सिद्धार्थ अलीकडेच ‘धुरळा’ या सिनेमातून रसिकांच्या भेटीला आला होता.

Recommended

PeepingMoon Exclusive