बॉलिवूडप्रमाणे मराठीतील स्टार किड्स सुध्दा नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या क्यूटनेसवर नेटकरी नेहमीच फिदा होतात. त्यांचे सेलिब्रिटी आई-बाब त्यांच्या बाललीला सोशल मिडीयावरुन चाहत्यांपर्यंत पोहचवतात आणि मग तो निरागस गोड फोटो किंवा व्हिडीओ पाहून चाहते त्यावर लाईक्स व कॉमेंट्सचा वर्षाव सुरु करतात. अभिनेता पुष्कर जोग याची दोन वर्षांची चिमुकलीसुध्दा खुप गोड आहे. त्याने नुकताच त्याची लेक फेलिशाचा एक क्युटनेस ओव्हरलोडेड असा व्हिडीओ सोशल मिडीयावर अपलोड केलाय..
ह्या व्हिडीओमध्ये फेलिशा एका शानदार मोठ्या बॉससारख्या खुर्चीवर बसून फोनवर गोड हॅलो... हॅलोचा घोष करतेय. तिच्या निरागस आवाजातला हा व्हिडीओ पाहायला खुपच मजा येतेय.
पुष्कर जोगची कन्या फेलिशा नुकतीच दोन वर्षांची झाली. पुष्करने लेक फेलिशा आणि पत्नी जस्मिनसह हा वाढदिवस दुबई येथे सेलिब्रेट केला होता.
बिग बॉस मराठी 2 फेम पुष्कर आता ‘वेल डन बेबी’ सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत अमृता खानविलकर आहे. यापुर्वी तो ‘ती अॅण्ड ती’ सिनेमातून रसिकांसमोर आला होता.