शेतकरी म्हटलं की अहोरात्र शेतात राबणारे कष्टकरी आणि आपल्या सर्वांचे अन्नदाता डोळ्यासमोर येतात. शेतकरी दिवस रात्र राबून शेतात पिक घेतात, त्या पिकांनासुध्दा जीव लावतात.
याच शेतक-यांचे कष्ट अलिकडेच आपल्या नव्या फोटोशूट मधून लागिरं झालं जी फेम अभिनेता निखील चव्हाणने दाखवून दिलं आहे.
अनेक सेलिब्रिटी विविध ट्रेण्डींग आणि फॅशनेबल फोटोशूट करुन निर्माते -दिग्दर्शकांचं व साहजिकच चाहत्यांचंसुध्दा मन जिंकण्याचा प्रयत्न करतात. पण निखिलने मात्र हे चाकोरी बाहेरचं फोटोशूट करत सर्वांचच लक्ष वेधू घेतलं आहे.
‘लागिरं झालं जी’ या मालिकेतून त्याचं देशाप्रती असणारं प्रेम,अभिमान पाहायला मिळालं होतं.तेच दर्शन नेहमीच त्याच्या कृत्यातून घडते आणि म्हणूनच देशाप्रती जीवाचे रान करणाऱ्या बळीराजाचं दर्शन त्याने फोटोशूटमधून सर्वांना घडवलंय.
शुध्द देसी रोमान्सची स्त्रीलिंग-पुल्लिंग, झी 5 ची वीरगती यासारख्या वेबसिरीजमधून आपल्या अभिनयाची छाप पाडणारा निखील लवकरच मराठीतल्या मोठ्या पडद्यावरही पदार्पण करतोय. त्यामुळे चाहत्यांना आता त्याच्या आगामी सिनेमाची उत्सुकता लागुन राहिली आहे.