By  
on  

कुलवधू ते बालिकावधू ...सुबोध भावेचा हा प्रवास तुम्हाला माहितीय का?

'अळीमिळी गुपचिळी' म्हणत सुबोध भावेला भेटल्या त्याच्या आजी माजी अभिनेत्री. तर नेटीझन्स म्हणतायत कुलवधू ते बालिकावधू  सुबोध भावेचा प्रवास पाहा. या फोटोवर अनेक कॉमेंट्सचा सध्या वर्षाव होत आहे. 

नुकत्याच एका रिएलिटी शोमध्ये सुबोध भावे आपल्या  पत्नी आणि मुलं मल्हार व कान्हासह आला होता.तर अभिनेत्री पूर्वा गोखले ही आपल्या दोन मुलींसह म्हणजेच अनुष्का व काश्वीसह पोहचली होती. त्यावेळी मुलांच्या गप्पा आणि धमाल-मस्ती सुरु असताना अचानक सुबोध भावेसाठी मंचावर एक सरप्राईज आहे असं सांगण्यात  आलं. सुबोध भावे डोळे मिटून उभा असताना मागे वळून पाहतो तो शाळकरी ड्रेसमध्ये त्याची तुला पाहते रेची  अभिनेत्री गायत्री दातार उभी होती. सर्वांनाच गायत्रीला पाहून हसू आवरत नव्हतं. एकच्च कल्ला झाला. 

सुबोधने पूर्वा आणि गायत्रीसोबत हा छान फोटो काढून सोशल मिडीयाद्वारे चाहत्यांसोबत शेअर केला आहे. चाहत्यांनी तर या फोटोवर लाईक्स आणि कॉमेंट्सचा पाऊस पाडला आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive