बॉलिवूडचं क्यूट कपल म्हणून रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख हे नाव लगेच डोळ्यासमोर येतं. २०१२ मध्ये लग्नगाठ बांधलेल्या या सुपरहीट जोडीचं मात्र 2002 पासून सूत जुळलं. बऱ्याच वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यातलं प्रेम सर्वांसमोर येतं. एकमेकांवरचं प्रेम ते नेहमीच व्यक्त करताना दिसतात. या आदर्श कपलची लव्हस्टोरी जाणून घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडेल.
रितेश- जेनेलियाचा ‘तुझे मेरी कसम’ हा पहिला सिनेमा. या सिनेमाच्या सेटवरच हैद्राबाद येथे दोघं एकमेकांना पहिल्यांदा भेटले. त्यावेळेस दोघांनी एकमेकांकडे थोडं दुर्लक्षच केलं. मुख्यमंत्र्यांचा मुलगा म्हणून जेनेलिया त्यात्याशी फक्त कामापुरताच बोलण्यास पसंती द्यायची. त्यानंतर मग रितेशने जनेलियाकडे मैत्रीचा हात पुढे केला आणि मग दोघांतली मैत्री खुलत गेली. मग पुढे जसा संपर्क वाढत गेला तसं मैत्रीचं प्रेमात रुपांतर होत गेलं. त्यावेळी रितेश २४ वर्षांचा होता तर जेनेलिया १६ वर्षांची होती.
एकमेकांची सोबत आणि सततचा संपर्क यातून त्याचं प्रेम खुलत गेलं. रितेश आणि जेनिलियाने 3 फेब्रुवारी 2012 रोजी बोहल्यावर चढण्याचा निर्णय घेतला. दोघे दोन वेळा विवाहबंघनात अडकले. त्यांचे कारण म्हणजे, जेनिलिया ख्रिश्चन आहे आणि रितेश हिंदू. त्यामुळे विवाहसोहळा हा महाराष्ट्रीयन व ख्रिश्चन या दोन्ही पध्दतीने पार पडला.
आजही रितेश-जेनेलियाची जोडी एकमेकांवर जीवापाड प्रेम करताना पाहायला मिळते. दोघंही तितकेचं नटखट आणि मस्तीखोर आहेत पण एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेले पाहायला मिळतात. दोघांना राहील आणि रेयान ही दोन गोंडस मुलंसुध्दा आहेत.
पिपींगमून मराठीतर्फे लाडक्या रितेश-जेनेलियाला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.....नांदा सौख्य भरे !