By  
on  

सायली संजीवने बांधला सिनेमांचा 'बस्ता'

'काहे दिया परदेस' म्हणत छोट्या पडद्यावरुन मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी साधी सोज्वळ अभिनेत्री सायली संजीवने आता मोठ्या पडद्यावर एकापाठोपाठ एक सिनेमांचा धडाका सुरु केला आहे. काही दिवसांपूर्वीच आटपाडी नाईट्समधून रसिकांच्या भेटीला आलेल्या सायलीचे 'मन फकीरा' आणि 'पैठणीची गोष्ट', 'सातारचा सलमान' हे  सिनेमे लवकरच प्रदर्शित होणार आहेत. त्यापूर्वीच तिच्या आणखी एका आगामी सिनेमाची घोषणा झाली आहे. 

सायलीच्या पदरात आणखी एक सिनेमा पडला आहे.ती आता 'बस्ता' या नव्या सिनेमात झळकतेय. या सिनेमाचं रंगतदार पोस्टर तिने शेअर केलं असून यासोबतच सिनेमाची रिलीज डेटही जाहीर केली आहे. लग्न म्हटलं, की बस्त्याची खरेदी स्वाभाविकपणे येते. बस्त्याची खरेदी ही एक गंमतीशीर गोष्ट असते.ती  या सिनेमात अनुभवता येणार आहे. 

मुंडावळ्या बांधलेली, चेहऱ्यावर आनंद असलेली सायली संजीव या पोस्टरवर दिसत आहे.त्यामुळे 'बस्ता' विषयीची उत्सुकता आणखी वाढली  आहे. 

 

'बस्ता' सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा तानाजी घोडगे यांनी सांभाळली असून चित्रपटात सायली संजीवसह, अक्षय टांकसाळे, पार्थ भालेराव अशी स्टारकास्ट आहे. येत्या 3 एप्रिलला 'बस्ता' सिनेरसिकांच्या भेटीला येतोय. 

श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्मस् प्रस्तुत आणि पीकल एंटरटेनमेंट अँड मिडीया लि. यांच्या सहयोगाने प्रदर्शित होत असून सुनील फडतरे आणि वर्षा मुकेश पाटील यांनी "बस्ता" चित्रपट ची निर्मिती केली आहे.अरविंद जगताप यांनी चित्रपटाचं लेखन केलं आहे. मंगेश कांगणे आणि शंकर पवार यांनी गीतलेखन, संतोष मुळेकर यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive