By  
on  

Photos : प्राजक्ता माळीचा हा नाचणीचे पापड लावलेला ड्रेस तुम्ही पाहिलात का?

अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या बहारदार सूत्रसंचलनाने सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम रंगत जातोय. या कार्यक्रमात अभिनेत्री प्राजक्ता विविध ड्रेसेस आणि लुक्समद्ये पाहायला मिळते. अनेकदा सोशल मिडीयावर ती आपल्या नवनवीन लुक्समधील फोटो शेअर करत असते. 

नुकतंच प्राजक्ताने एक खास फोटोशूट केलं आहे आणि या ड्रेसचं नाव तिने चक्क 'नाचणीचे पापड लावलेला ड्रेस' असं ठेवलंय. वाचून आश्चर्य वाटलं ना. पण अहो हे, खरं आहे.  खरं तर या ड्रेसचं बारसं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाचे स्टार कलाकार समीर चौगुले यांनी केलं आहे. त्यांना तिने सौजन्यही देऊन टाकलंय. हे धम्माल नाव प्राजक्तानेच सोशल मिडीयावर चाहत्यांसोबत शेअर केलं. या ड्रेसचं भन्नाट नाव ऐकून चाहत्यांनी लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव सुरु केला आहे.

मोल्टन गोल्ड आणि बर्गंडी शेडमधील स्ट्रक्चर रफल्ड साडीमध्ये प्राजक्ताच्या सौंदर्य मात्र खुलून दिसतंय. तिने अत्यांत उत्तम अशी साडी कॅरी केली आहे. नेटकरी तर म्हणतायत ड्रेस कुठलाही असो तू मात्र सुंदरच दिसतेय. 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive