By  
on  

'मला भूतानं पछाडलं' फेम अभिनेत्री मेघा घाडगे अडकली लग्नबंधनात

सध्या सर्वत्र वेडींगचा सीझन सुरु आहे. ही लग्नसराई आपण सर्वच एन्जॉय करतोय. मराठी मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रिटीसुध्दा यंदा एकापाठोपाठ एक लग्नबंधनात अडकतायत.  'मला भूतानं पछाडलं' हे भरत जाधवचं सुपरहिट गाणं आठवतंय. .. ना! मग त्यात भरत जाधवची नायिका तरह तुम्हाला माहितचं असेल. हो तिच अभिनेत्री मेघा घाडगे. पण मेघा अभिनेत्री लावणीसम्राज्ञी म्हणून अधिक प्रसिध्द आहे.

 

मेघा नुकतीच लग्नबंधनात अडकलीय आणि याची माहिती खुद्द मेघानेच तिच्या फोसबुक अकाऊंटवरुन चाहत्यांना दिलीय. 

मेघाने फेसबुकवर आपण लग्नबंधनात अडकल्याचं सांगितल्यानंतर तिच्यावर चाहत्यांनी अभिनंदनाचा आणि लाईक्सचा वर्षाव सुरु केला आहे. लावणीसम्राज्ञी मेघाने पछाडलेलासोबतच पोपट, चल धरपकड, नवरा माझा भोवरा, माहेरची माया आदी सिनेमांमध्ये तिने आपल्या लावणीने रसिकांवर भुरळ घातलीय. 

छोट्या पडद्यावरील डान्स रिएलिटी शोमधूनसुध्दा मेघाने आपली छाप पाडली आहे. लावणीत पारंगत असलेल्या मेघाचे अनेक चाहते आहेत. ती सध्या नृत्याचे क्लासेसुध्दा घेते. नव्या आयुष्यासाठी पिपींगमून मराठीतर्फे मेघाला खुप खुप शुभेच्छा !

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive