संस्कृती बालगुडे ही मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड आणि ब्युटीफुल अभिनेत्रींपैकी एक आहे. नेहमीच बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोशूट करुन चाहत्यांना आश्चर्यचकित करणारी अभिनेत्री संस्कृतीने यावेळेस मात्र पारंपारिक अंदाजातील फोटोशूट मधून चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
निळ्या रंगाच्या या परकर पोलक्याच्या ज्युन्या स्टाईलमध्येसुध्दा संस्कृतीचं सौंदर्य खुललं असून तिच्या या अदा पाहून तुम्ही फिदा नाही झालात तरच नवल.
हा सुंदर फोटो शेअर करत संस्कृतीने कवितेच्या काही सुंदर ओळीसुध्दा शेअर केल्या आहेत. संस्कृती म्हणते, "“.... प्रीत ही, रीत ही उमजेना...जडला का जीव हा... समजेना कशी सांगू मी, कशी सांगू मी माझ्या मनीची कथा रे...”
छोट्या पडद्यावरील पिंजरा ह्या मालिकेद्वारे आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. संस्कृती सोशल मिडीयावर नेहमीच अॅक्टीव्ह असते. आपल्या अपकमिंग प्रोजेक्टसबद्दल आणि नवनव्या लूक्सबद्द्लची माहिती चाहत्यांसोबत ती शेअर करते. नुकतंच तिची महत्त्वपूर्ण भूमिका असलेली झी 5 ची 'काळे धंदे' ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला आली. आता सर्वांनाच तिच्या आगामी प्रोजेक्ट्सची आतुरता लागून राहिली आहे.