By  
on  

सुह्रद वार्डेकर आणि सायली संजीव म्हणतायत, 'प्रेम हे'

कोणाला त्यांचं पहिलं प्रेम आठवतं तर काही जण पुन्हा नव्याने आपल्या प्रियकराच्या प्रेमात पडतात. ह्याच दिवसाचं औचित्य साधून “माणसांनी केवळ कुटुंबापुरतं न जगता देशासाठी आणि समाजासाठी काही तरी केलं पाहिजे”, असा सुंदर विचार मांडणा-या ‘दाह एक मर्मस्पर्शी कथा’ या सिनेमातील स्वप्नील बांदोडकर आणि बेला शेंडे ह्यांचा सुरेल आवाजातील 'प्रेम हे' रोमँटिक गाणं आज प्रदर्शित झाले आहे. मंदार चोळकर ह्यांनी लिहिलं असून संगीतकार प्रफुल्ल स्वप्निल ह्यांनी ह्या गाण्याला संगीत दिले आहे. हे गाणं सायली संजीव आणि सुहृद वार्डेकर यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे.

प्रेम म्हंटल की त्यात रुसवे – फुगवे, आपुलकी, जिव्हाळा या सर्व गोष्टी आपसूक आल्याच. आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा प्रेमाची परिभाषा सांगणारं “प्रेम हे” हे गीत हे अनेकांसाठी नक्कीच व्हॅलेंटाईन डे स्पेशल गिफ्ट ठरणार आहे.

माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या या चित्रपटाची निर्मिती युगंधर क्रिएशन्सचे अनिकेत राजकुमार बडोले यांनी केली आहे. मल्हार गणेश यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे तर डॉ. सतीश (अतुल) सोनोने यांनी कथा लिहिली आहे. सायली संजीव, गिरीश ओक, राधिका विद्यासागर, सुह्रद वार्डेकर, यतिन कार्येकर, उमा सरदेशमुख, किशोर चौघुले यांच्या महत्वपूर्ण भूमिका असलेला ‘दाह एक मर्मस्पर्शी कथा’ येत्या १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive