मोठा पडदा असो किंवा छोटा, हिंदी असो किंवा मराठी रोहिणी हट्टंगडी यांनी सशक्त अभिनेत्री म्हणून त्यावर नेहमीच आपला ठसा उमटवला आहे. कधी शिस्तप्रिय, तर कधी प्रेमळ तर कधी कठोर अशा भूमिकांमधून रसिकांच्या भेटीला येणा-या रोहिणीताई आता एक खट्याळ पण तितकीच मॉर्डन आजी म्हणून रसिकांसमोर येत आहेत. 'डॉक्टर डॉन' या मालिकेत त्या आपल्याला आता एका हटके भूमिकेत पाहायला मिळतील.
'डॉक्टर डॉन' ही नवीकोरी मालिका लवकरच झी युवा वाहिनीवर प्रसारित होत आहे. अभिनेता देवदत्त नागे आणि अभिनेत्री श्वेता शिंदे यात प्रमुख भूमिका साकरतायत. जलेश क्रुझवर 'डॉक्टर डॉन' मालिकेचा लाँच सोहळा नुकताच पार पडला. या मालिकेतील आपल्या भूमिकेविषयी पत्रकारपरिषदेत बोलताना रोहिणीताई कॉलेजच्या दिवसातील मोरपंखी आठवणींमध्ये रममाण झाल्या. रोहिणीताई म्हणतात, "मी 18 वर्षांची झाल्यावर सर्वप्रथम स्कूटर चालविण्यासाठी म्हणून लर्निंग लायसन्स हवं यासाठी तगादा लावला होता. पुण्यात त्यावेळी आम्ही बिनधास्त बेधडक स्कूटर चालवायचो. पूर्वी आत्तासारखं नव्हतं, त्यामुळे खुप मजा यायची बेधूंद स्कुटर चालवायला. त्यामुळे त्या स्कुटरचं आणि माझं एक खास नातं आहे, पण या मालिकेच्या निमित्ताने मला ते पुन्हा अनुभवता आलं.इथे सीन्समध्ये नातवाच्या स्कुटरवर मागे बसून मी तेच दिवस पुन्हा जगले."
डॉक्टर देवदत्त म्हणजेच ‘देवा’ त्याच कॉलेजच्या डीनच्या म्हणजेच श्वेता शिंदेच्या प्रेमात पडला आहे. पण त्याची पेशंट तपासण्याची हटके पद्धत डीनची डोकेदुखी बनली आहे. आता या अतरंगी प्रेमकथेत येणारे ट्वीट प्रेक्षकांचं मनोरंजन करतील यात शंका नाही.
डॅशिंग डॉनची, डार्लिंग डीन
"डॉक्टर डॉन" नवीन मालिका 12 फेब्रुवारीपासून, सोम - शनि रात्री 9 वा फक्त #ZeeYuva वर. #DoctorDon pic.twitter.com/PYHQPoTOav— Zee Yuva (@Zee_Yuva) February 2, 2020